
राष्ट्रवादीची पेटलेली वात मशाल बनल्याशिवाय राहणार नाही : शशिकांत शिंदे
कुडाळ : जिल्हा बँकेच्या निवडणूकीपासून (District bank election) पुलाखालून बरेच पाणी गेलेले आहे, जावळीचा नावलौकिक वाढावा म्हणून तालुक्यातील सर्व भूमिपुत्र एकत्र आलेले आहेत,काही लोकांना राजकारणातील (Politics) माझा अडसर वाटायला लागला होता, जिल्हा आपल्याच हातात असावा अशी मानसिकता झाली होती त्यामुळेच त्यांच्या रसत्यातील माझा अडसर घालवण्यासाठी या निवडणुकीत (Election) प्रयत्न करण्यात आला, जावळीतील माणूस पक्का असतो त्यामुळे जावलीतील जनता जवळीतल्याच माणसाला डोक्यावर घेऊन नाचेल असा विश्वास व्यक्त करून आम्ही राजे नसलो तरी सर्व सामान्य जनतेच्या मनातील राजे नक्कीच आहोत,असा घाणाघात आमदार भोसले यांचे नाव न घेता आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
मोरखिंड ता,जावळी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी श्री शिंदे बोलत होते, पुढे ते म्हणाले, मी कोणालाही आव्हान करनार नाही,राजकारणात कोणी कितीही मोठे व्हावे पण स्वतः मोठे होत असताना इतरांना संपवण्याचा प्रयत्न केला तर आपणच एक दिवस संपणार नाहीना याची काळजी घ्यावी असा उपरोधिक टोलाही यावेळी शशिकांत शिंदे यांनी विरोधकाना लगावला,पुढे ते म्हणाले मागील 10 वर्षात जावलीत किती कामे झाले याबाबत मला आता शंका जाणवू लागली आहे, जावलीतील जनतेसाठी मी कायमस्वरूपी कटिबद्ध आहे, विकासकामांसाठी कोणापुढे हाथ जोडण्याची गरज आता यापुढे लागणार नाही, भविष्यात माझ्यवर असेच प्रेम जवलीकरांनी ठेवावे, तालुक्यातील राष्ट्रवादी च्या कार्यकत्यानी एकत्र येऊन यापुढे काम करावे, जावलीत पेटलेली ही वात भविष्यात मशाल बनल्या शिवाय राहणार नाही.
हेही वाचा: आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट; कर्नाटकी पोलिसांची दडपशाही
असा ठाम विश्वास ही यावेळी त्यानी व्यक्त केला, यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून मोरघर येथे सभा मंडप , पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांच्या फंडातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात काँक्रीटीकरण ,जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या फंडातून मोरघर स्मशानभूमी रस्त्यावरील पूल, ग्रामपंचायत नवीन इमारत , तसेच आमदार शशिकांत शिंदे यांच्या फंडातून मोरखिंड गटार व काँक्रीट करण आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, अमित कदम,माथाडी कामगार नेते सुरेश तात्या गायकवाड,अजित भोसले, तुषार सावंत,मोरघर सरपंच रंजना मोरे, उपसरपंच आशालता गायकवाड, प्रतापगड चे संचालक भानुदास गायकवाड, सुरेश गायकवाड, महीगाव सोसायटी चेअरमन रमेश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, निलेश गायकवाड, दता गायकवाड, चंद्रकांत गायकवाड यांच्यासह मोरखिंड ग्रामस्थ व मोरघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Web Title: Shashikant Shinde Rashtravadi In Satara District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..