आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट; कर्नाटकी पोलिसांची दडपशाही

शहरात जमाव बंदीचा आदेश लागू असतानाही कन्नडीगानी रविवारी सकाळी शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.
Karnataka Police
Karnataka PoliceSakal

बेळगाव : शहरात जमाव बंदीचा आदेश लागू असतानाही कन्नडीगानी रविवारी सकाळी शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच पिरणवाडी नाका येथे मोठ्या संख्येने जमलेल्या कन्नड (Kannada) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी (Police) कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळातच त्यांची सुटका केली त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली.

बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण पसरले आहे. तरीही कन्नड संघटनांकडून शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. शनिवारी शिवप्रेमी नागरिकांनी पुतळा विटंबनेचा जाहीर निषेध करीत गावागावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करून आपला बाणा दाखवून दिला होता. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या कन्नड संघटनांनी रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच पिरनवाडी नाका येथे जमून मराठी भाषिकांनी विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली होती. तसेच जाणीवपूर्वक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात घोषणाबाजी करून आपला कंडु शमवून घेण्याचा प्रयत्न केला.

Karnataka Police
हॉकी इंडियाचा पैसा गेला फॉरनच्या बँकेत; हिशोब द्यावा लागणार

तसेच शहराच्या विविध भागातून मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या पोलिसांनी जमावबंदी असल्यामुळे रॅली काढता येणार नाही अशी माहिती कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना दिली तरीदेखील कोणत्याही परिस्थितीत शहरातून रॅली काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बराच वेळ पोलिसांची हुज्जत घातली.

अनेक वेळा सांगून देखील शहरात रॅली काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने पुढे सरकण्याचा प्रयत्न करताच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी कार्यकर्ते व पोलीस चांगलीच वादावादी पाहावयास मिळाली.मात्र दरवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठी भाषिकांवर लाठी उगारणाऱ्या पोलिसांनी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांना समज देऊन काही वेळातच सोडून दिले त्यामुळे मराठी भाषिकांना एक न्याय आणि कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना एक न्याय देणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेबद्दल मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त झाला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही शहरातून जात असताना घोषणा देऊन वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांचा कार्यकर्त्यांकडून केला जात होता याकडे प्रशासनाने वेळीच असणे गरजेचे असून फक्त मराठी भाषिकांना शांत करण्याचे आवाहन करण्याऐवजी शांतता भंग करणाऱ्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना योग्य समज देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Karnataka Police
Video : बेन स्टोक्सचा अफलातून कॅच; व्हिडिओ व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर संताप व्यक्त करणाऱ्या मराठी भाषिकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांनी पिरनवाडी नाका येथे गोंधळ घालणार्‍या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करणे गरजेचे होते.मात्र फक्त मराठी भाषिकांना टारगेट करणाऱ्या पोलीसानी कन्नड संघटनाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळातच त्यांना सोडून दिले. यावरून पोलिसांचा दुजाभाव स्पष्टपणे दिसून आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com