

District Bank Election Shashikant Shinde Takes a Dig at Ramraje Nimbalkar Over Voter Poaching and Political Developments
sakal
सातारा: जिल्हा मध्यवर्ती बँक पक्षविरहित असणे गरजेचे आहे. बँकेच्या आगामी निवडणुकीत घडामोडी काय घडतात? यावर आम्ही निर्णय घेणार आहोत. रामराजे नाईक-निंबाळकर हे ज्येष्ठ नेते आहेत. बँकेच्या निवडणुकीत मतदार पळवापळवी होणार असल्यास त्यांनी लक्ष द्यावे. आतापर्यंत त्यांनी पळवापळवी थांबविली नाही. पुढील निवडणुकीत तरी थांबवावी, असा मिश्कील टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मारला.