

Tourism to Mahabaleshwar and Panchgani Affected as Shashikant Shinde Targets Contractor Over Road Work
sakal
सातारारोड : कंत्राटदार काय जावई आहे का? असा संतप्त सवाल करत सुरूर ते पोलादपूर या मार्गावरील काम रखडल्याने महाबळेश्वर, पाचगणीचे पर्यटन गेल्या दीड-दोन वर्षांपासून अडचणीत आले असून, या प्रश्नामध्ये पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत केली. त्यावर याप्रश्नी बांधकाममंत्र्यांशी चर्चा करून बैठक लावली जाईल, असे उत्तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.