
सातारारोड : कोरेगाव तालुक्यातील जनतेने मला आजवर दिलेले प्रेम आणि बळ मी कधीही विसरू शकणार नाही. कोरेगावकरांच्या आशीर्वादामुळेच मला पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत ‘आता राज्यभर काम करताना उपेक्षित घटकांचा आवाज होण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. विरोधकांना आलेला सत्तेचा माज उतरवायला आता आपल्याला रस्त्यावर उतरावेच लागेल,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना ठणकावले.