
सातारा : कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत कोरोना संसर्गापासून बचाव कसा करावा याबाबतची घरोघरी जावून जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृतीचा एक भाग म्हणून या मोहिमेंतर्गत सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने फेसबुक प्रश्नमंजुषा स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, व्हिडीओ स्पर्धांचे करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
या स्पर्धेची माहिती सिंह यांनी दिली. फेसबुक प्रश्न मंजुषा स्पर्धा सातारा जिल्ह्यासाठीच्या सर्व नागरिकांसाठी खुली राहील. 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत 'कुटुंबाची साथ - कोरोनावर मात' या विषयावर सोशल मिडीयावरील जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/dioinfosatara या फेसबुकपेजवर प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येईल. या फेसबुकपेजवर आठ ऑक्टोबरला दुपारी एक वाजता प्रश्नावली विचारली जाईल. स्पर्धकाने या प्रश्नांची उत्तरे कमेंटबॉक्समध्ये द्यायची आहेत. ज्याची पहिले उत्तर येतील ते विजेते राहतील. सर्व प्रश्नांची जिल्हास्तरावर परिक्षकांमार्फत परिक्षण केल्यानंतर सर्वप्रथम अचूक उत्तर देणाऱ्या स्पर्धकास विजेता घोषित केले जाईल.
CET परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना 'एसटी' ने करता येणार प्रवास, 1500 बसेस उपलब्ध
छायाचित्र स्पर्धा सातारा जिल्ह्यासाठीच्या सर्व नागरिकांसाठी खुली राहील. 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत 'कुटुंबाची साथ - कोरोनावर मात' या विषयाचे छायाचित्र असावे. स्पर्धकाने छायाचित्र व त्यासोबत आपले नांव, वय, मोबाईल क्रमांक, पत्ता टाईप करुन दहा ऑक्टोबर सायंकाळी चार वाजेपर्यंत dio_satara@yahoo.com किंवा sataradio5@gmail.com या इमेल पत्यावर सादर करावे. सर्व प्राप्त छायाचित्रांची जिल्हास्तरावर परिक्षकांमार्फत परिक्षण केल्यानंतर निवड करण्यात येईल.
उदयनराजेंच्या इतरांचेही आरक्षण रद्द करा भुमिकेमुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटणार ?
व्हिडीओ स्पर्धा सातारा जिल्ह्यासाठीच्या सर्व नागरिकांसाठी खुली राहील. 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत 'कुटुंबाची साथ - कोरोनावर मात' या विषयावर आपल्या कल्पनाशक्तीवर जास्तीत जास्त पाच मिनीटापर्यंत व्हिडीओ तयार करावा. आपले व्हिडिओ पाठवितांना सोबत आपले नांव, वय, मोबाईल क्रमांक, पत्ता टाईप करुन दहा ऑक्टोबर सायंकाळी चार वाजेपर्यंत dio_satara@yahoo.com किंवा sataradio5@gmail.com या इमेल पत्यावर सादर करावेत.
विद्यार्थ्यांसाठी नोकरीत नसलेलेल्या शिक्षकांनी शिक्षक मित्र याेजनेत पुढाकार घ्यावा
प्राप्त व्हिडिओंची परिक्षकांमार्फत परिक्षण करुन जिल्हास्तरावर पात्र स्पर्धकाची निवड करण्यात येईल. या विविध स्पर्धेतील पहिल्या क्रमांकास पाच हजार, दुसऱ्या क्रमांकास तीन हजार व तिसऱ्या क्रमांकास दाेन हजार रुपये बक्षिस व 'कोरोना योध्दा' म्हणून प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
ऑनलाइन शिक्षणासाठी दहा विद्यार्थ्यांना 'रोटरी' तर्फे मोबाईल भेट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.