साता-याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाडले तहसीलदारांना आदेश

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 15 October 2020

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावयाचा असल्याने अहवाल तात्काळ सादर करावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सातारा : ऑक्टोंबर 2020 मध्ये अतिवृष्टी व पूरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहे.

शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करुन 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबात बाधित शेतकऱ्यांना 13 मे 2015 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेला एकत्रित प्रस्ताव प्रपत्र अ,ब,क,क, ड मध्ये अहवाल सादर करावा.

भीमा नदीवरील बेगमपूर पूल पाण्याखाली; सोलापूर-मंगळवेढा वाहतूक ठप्प 
 

येणाऱ्या प्रस्तावामध्ये एकाच लाभार्थ्यासाठी मदतीची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावयाचा असल्याने अहवाल तात्काळ सादर करावा, असेही आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहे.

सावधान! चक्रीवादळ सातारा-वडूजमार्गे जाणार मुंबईला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar Singh Orders Tahsildar To Report Loss Of Farms Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: