
armers stage ‘Kharda-Bhakari’ protest in Karad demanding soybean guarantee price centers; slogans raised by Shetkari Sanghatana, RSP, and Baliraja Sanghatana.
Sakal
कऱ्हाड : सोयाबीनची खरेदी हमीभावाप्रमाणे न करता शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. त्यासंदर्भात दै. ‘सकाळ’ने आज बातमी प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने सरकारने तातडीने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी सहकार उपनिबंधकांच्या येथील कार्यालयाच्या दारात ऐन दिवाळीदिवशीच शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना, रासपच्या संयुक्तपणे चटणी भाकरी खाऊन सरकार व व्यापाऱ्यांचा तीव्र निषेध केला.