
Disheartened health workers in Maharashtra lament “Shimga instead of Diwali” as salaries remain pending; financial struggles deepen ahead of the festive season.
Sakal
सातारा : गावागावांत जनतेच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणारे आरोग्य सेवक आणि आरोग्य सहाय्यक यांनाच स्वतःच्या घरातील दिवाळी कशी साजरी करायची? असा प्रश्न पडला आहे. या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा झाली आहे. ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दिवाळीच्या सणाला पगार त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. परिणामी, दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांची दिवाळी ‘पगाराविना’च साजरी होणार असून, नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.