
वडूज : शिरसवडी (ता. खटाव) येथील अंगणवाडीत शिकणाऱ्या पाच वर्षांच्या बालिकेसह सात वर्षांचा तिचा भाऊ उरमोडी कालव्यात बुडाले. यात बालिका रिया शिवाजी इंगळे (वय पाच) हिचा मृतदेह सापडला असून, तिचा भाऊ गणू शिवाजी इंगळे (वय सात) अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे. दोघे बहीण-भाऊ शाळेतून घरी येताना आज दुपारी ही दुर्दैवी घटना घडली.