
खंडाळा : शिरवळ (ता. खंडाळा) येथे भर रस्त्यात फळविक्रेत्या युवकावर अज्ञात मारेकऱ्यांनी कोयत्याने सपासप वार केल्याची घटना आज सायंकाळी उशिरा साडेनऊच्या सुमारास घडली. यामुळे शिरवळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तौफिक इब्राहिम बागवान (वय २९ रा. शिरवळ) असे या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.