

Fatal Head-On Collision Near Veer Dam
Sakal
शिरवळ : शिरवळ - लोणंद रस्त्यावरील वीर धरणालगत असण्याऱ्या तोंडल (ता . खंडाळा ) गावच्या हद्दीत दोन्ही कारची समोरासमोर जोराची धडक होऊन, झालेल्या भीषण अपघातात एकजण जागेवरच मयत झाला,तर सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . समीर हमीद शिकलगार ( वय ४५ रा. शिरवळ ) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . या रस्ताच्या चौपदरीकरण कामामुळे ड्रायव्हरशन न कळल्याने हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले .