
खंडाळा : शिरवळ (ता. खंडाळा) येथे एमआयडीसीत पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा तलवारीने वार करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास येथील एका कंपनीच्या रस्त्यावर घडली. अमर शांताराम कोंढाळकर (वय २२, रा. वडवाडी, ता. खंडाळा) हे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित तेजस महेंद्र निगडे (वय १९, रा. गुणंद, ता. भोर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.