
खंडाळा: शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येतात. आता शिक्षण विभागाने ‘शाळा भेटी’ हा नवा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शिरवळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. दरम्यान, शाळेतील विद्यार्थिनींनी त्यांची चक्क इंग्रजीतून मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना नागराजन यांनी दिलखुलास उत्तरे दिली.