भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांसाठी चड्डी बनियान आंदोलकांची साता-याला कूच

अशपाक पटेल
Tuesday, 12 January 2021

आमच्या मागण्या थेट जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पाेचविणार आहाेत. केवळ त्यांची भेट घेणार आहे. इतर कोणत्याही दुसऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटणार नाही अशी भुमिका आंदाेलकांनी घेतली आहे.

शिरवळ (जि. सातारा) : शिरवळसह परिसरात असलेल्या कंपन्यात स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात, या मागणीसाठी शिरवळ येथून दोघांनी शिरवळ ते सातारा असे चालत अर्धनग्न पायवारी सुरू केली असून आंदाेलक आज (मंगळवार) साता-यात पाेचतील. यामध्ये इम्रान कलाम काझी व अंजिक्‍य अलबत कांबळे हे सहभागी झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा 

साेमवारी सकाळी येथील अंबिकामाता मंदिराजवळ गावातील काही युवक जमले व या अर्धनग्न चड्डी बनियान आंदोलनास पाठिंबा दिला. त्यानंतर खंडाळा येथील डॉ. आंबेडकर व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

भारतीय हाॅकी संघातील मुलींचा युवा वर्गास संदेश; माेबाईलच्या चक्रव्हूयातून बाहेर पडा, मैदानात उतरा! 

या आंदोलकांनी भुईंज (ता. वाई) येथे रात्री मुक्काम केला आहे. आज (मंगळवारी) ते साताराकडे कूच करणार आहेत. साता-यात आंदाेलक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना भेटणार आहेत. त्यावेळी त्यांच्या मागण्यांचे निवेदन देणार आहेत. याबाबत आंदोलक इम्रान काझी यांनी सांगितले, की स्थानिक भूमिपुत्रांसाठी हा लढा असून, अर्धनग्न अवस्थेत शिरवळ ते सातारा पायी चालत जात आहोत. या वेळी केवळ जिल्हाधिकारी यांचीच भेट घेणार आहे. याबाबत इतर कोणत्याही दुसऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटणार नाही.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirwal Youth Agitation For Employment Satara News