
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी बाबत राज्याचे लक्ष असते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात शिवधनुष्य पेलण्यासाठी शिवसेना राजकीय रणांगणात उतरली आहे. जिल्ह्यात शिव सेना जिल्हाप्रमुख रणजीतसिंह भोसले यांनी भव्य दिव्य शक्ती प्रदर्शन केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये धनुष्यबाण दिसण्याचे चिन्ह दिसू लागलेले आहेत.