
राजाळे: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींच्या मागण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आमदार बच्चू कडू यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने फलटणमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे पुणे- पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प होती.