
कऱ्हाड: जिल्ह्यात शिवसेना भक्कम करण्यासाठी, सर्वतोपरी झटण्यासाठी तयार राहा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र यादव यांनी केले. कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी श्री. यादव यांनी पदाधिकाऱ्यांशी संवादही साधला.