सातारा पालिकेस टाळे ठोकण्‍याचा शिवसेनेचा इशारा | Satara Political news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara muncipality

सातारा पालिकेस टाळे ठोकण्‍याचा शिवसेनेचा इशारा

सातारा : साताऱ्यातील मंगळवार तळे, कोल्‍हटकर आळी येथील सोहनी गिरण आणि गोलमारुती मंदिराजवळील अतिक्रमित बांधकामांवर कारवाई करण्‍यास पालिका(satara nagarparishad) टाळाटाळ करत असल्‍याच्‍या आरोप करत शिवसेनेच्‍या(shivsena satara) शहर शाखा पदाधिकाऱ्यांनी पालिकेस टाळे ठोकण्‍याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

हेही वाचा: शाळा, महाविद्यालये, क्लास बंद करू नयेत

या निवेदनावर शहर संघटक प्रणव सावंत, शहर उपप्रमुख अमोल गोसावी, संजय पवार, ओंकार गोसावी आदींच्‍या सह्या आहेत. मंगळवार तळे परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्‍याकामादरम्‍यान मुख्‍य रस्‍त्‍यालगत योग्‍य प्रमाणात जागा सोडण्‍यात आली नाही. याची तक्रार शिवसेनेच्‍या वतीने अमोल गोसावी यांनी पालिकेकडे केली होती. याच तक्रारीत सोहनी गिरण, तसेच गोलमारुती मंदिर येथे सुरू असणाऱ्या इमारतीच्‍या कामादरम्‍यानही रस्‍ता रुंदीकरणासाठीची जागा सोडण्‍यात आली नसल्‍याचेही नमूद करण्‍यात आले होते. याबाबतची माहिती घेतली असता, गोसावी यांना नवीन इमारत बांधकाम करताना मुख्‍य रस्‍त्‍यापासून किती अंतर सोडणे आवश्‍‍यक असल्‍याचे माहिती देणारे पत्र पालिकेने दिले.

या पत्रानुसार बांधकाम व्‍यावसायिकाने(builder) जागा सोडली नसल्‍याची तक्रार करूनही पालिकेने कारवाई न केल्‍याने आज शिवसैनिकांनी त्‍याठिकाणी जाऊन रस्‍ता व त्‍यालगत झालेल्‍या बांधकामामधील अंतर मोजले. या मोजणीत शासन आदेशानुसार जागा सोडण्‍यात आले नसल्‍याचे समोर आले. यामुळे शिवसेनेच्‍या पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या व्‍यावसायिकास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्‍यास पालिकेस टाळे ठोकण्‍याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Shiv Sena Warns To Block Satara Municipality Because No Action Against Illegal Construction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..