शाळा, महाविद्यालये, क्लास बंद करू नयेत | SSC and HSC exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC and HSC exam
शाळा, महाविद्यालये, क्लास बंद करू नयेत

शाळा, महाविद्यालये, क्लास बंद करू नयेत

नांदेड : सध्या जानेवारीचा महिना सुरु असून दीड महिन्यांनी दहावी आणि बारावी तसेच विद्यापीठ व इतर परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांनी (student) वर्षभर अभ्यासात मेहनत घेतलेली आहे. शिवाय पालकांनीही पाल्यांच्या शिक्षणावर लाखो रुपये खर्च केला आहे. अशावेळी शाळा, महाविद्यालये (School and college) आणि कोचिंग क्लासेस (Coaching class) पूर्णपणे बंद करणे योग्य होणार नाही. शासन निर्धारित निर्बंधांच्या(Restrictions) अनुपालनामध्ये शिक्षणप्रवाह सुरु ठेवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा: लॉकडाऊनमध्ये विजेच्या निर्मितीसाठी राज्यावर २ हजार कोटींचे कर्ज

राज्य शासन सध्या कोरोना आणि ओमिक्रॉन संक्रमणाशी लढण्यासाठी सक्षम आणि तत्पर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वात शासनाकडे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्यात लसीकरणाचे कार्य देखील समाधानकारक झाले आहे. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे शतप्रतिशत लसीकरण देखील गरजेचे आहे. अशावेळी शाळा व महाविद्यालय बंद करणे योग्य आहे काय? याचा विचार शिक्षण विभागाने करणे गरजेचे वाटते.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून वाद; 'मविआ'चं प्रत्युत्तर

मागील दोन वर्षात शाळा व महाविद्यालय वेळोवेळी बंद केल्यामुळे शिक्षण क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाले आहेत. अनेक लहान शाळा, बालवाड्या बंद पडल्या आहेत. सुशिक्षितांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अनेकांनी आपला रोजगारही गमावला आहे. अशा परिस्थितीचे शासनातर्फे गंभीरतेने विवेचन करणे गरजेचे आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल वापराचे प्रमाण वाढले आहे. घरी राहणाऱ्या मुलांना व्यायाम व खेळण्यासाठी योग्य संधी मिळत नाही. शासनाने किंवा शिक्षण विभागाने कोरोना संक्रमणाविषयी दक्षता बाळगण्यासाठी नव्याने नियम अंमलात आणून शाळेत शिक्षण कसे देता येईल, त्याविषयी योजना हाती घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा: पुण्यात नवे निर्बंध? रुग्ण वाढल्यानंतर अजित पवारांची तातडीची बैठक

सर्व प्रकारच्या बाजारपेठा, हॉटेल्स, रेस्टारंट शंभर टक्के सुरु आहे. असे असताना शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्गच बंद कशासाठी केले? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करून शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्ग सुरु करावेत.

- रविंद्रसिंग मोदी, नांदेड.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nanded
loading image
go to top