
-प्रशांत घाडगे
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला. या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे दालन (मॉडेल) व ऐतिहासिक माहिती आता साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात पाहावयास मिळणार आहे. यानिमित्त मूठभर मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवछत्रपतींची गौरवगाथा अनुभविण्याची संधी इतिहासप्रेमींना मिळणार आहे.