
सातारा : संपूर्ण देश छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांच्या आदर्शावर चालतो. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या दिवशी राजघराण्याच्या गादीचा वारसा सांगणाऱ्यांनी संपूर्ण शहरभर साऊंडच्या दणदणाटात त्यांचाच वाढदिवस साजरा करणे हे दुर्दैव आहे. ही घटना शिवप्रेमींना दुखावणारी असून, गादीचा वारसा चालविणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा वारसा आदर्श पद्धतीने चालवावा, अशी अपेक्षा असल्याचे मत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले.