

Dignity of Labour Celebrated Through Shivam’s Inspiring Gesture
Sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड : स्वार्थ, लालसा आणि अविश्वासाने व्यापलेल्या आजच्या काळातही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा विश्वास पुनः एकदा पुण्यातील कचरा वेचक अंजू माने यांच्या रूपाने दृढ झाला. रस्त्याच्या कडेला कचरा वेचत असताना पडलेल्या एक बॅगेत त्यांना दहा लाख रुपये सापडले. त्या रकमेने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकली असती; पण त्यांनी पैशांऐवजी माणुसकी निवडली. हाच प्रामाणिकपणाचा क्षण शिवम प्रतिष्ठानने समाजासमोर उचलून धरत अंजू माने यांचा तरुणाईपुढे सन्मान केला अन् सत्काराने भारावून अंजू मानेंनाही कृतार्थतेचे अश्रू आवरता आले नाहीत.