
सातारा : शेंद्रे येथील माळरानावर (कै.) भाऊसाहेब महाराजांनी लावलेल्या सहकाररूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देणारा हा कारखाना सक्षम झाल्याने भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.