
- गिरीष चव्हाण
साताराः विलासपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेणार असून त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतेच येथील कार्यक्रमादरम्यान दिले. याठिकाणी झालेल्या मर्दानी खेळांच्या सादरीकरणाचेही त्यांनी या वेळी कौतुक केले.