
कऱ्हाड : पूर्वीपासून जिल्ह्यात कोणी कोणाच्या सहकारी संस्थेत लक्ष घालायचे नाही, ही प्रथा सर्व नेत्यांनी पाळलेली आहे. त्यामुळे संस्थेच्या हिताचा जो निर्णय असेल तो सभासदच घेतील, असे स्पष्ट मत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात व्यक्त केले.