
सातारा: राजवाडा परिसरातील जनावरांचा दवाखाना येथील सुमारे २८०० चौरस मीटर जागेत बहुमजली इमारत बांधणार असून, तेथे दुचाकी व चारचाकी मिळून एकूण २५० वाहनांसाठी वाहनतळ, खाऊ गल्ली तसेच गच्चीवर कॅफेटेरिया असेल. त्यासाठीचा ५० कोटी रुपयांचा निधी केंद्र आणि व राज्य सरकार यांच्या भांडवली खर्चातून येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.