Shivendraraje Bhosale
sakal
सातारा : जिल्ह्यात कोरेगाव सोडले, तर उर्वरित ठिकाणी भाजप स्वबळावर लढत आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने कोण ना कोण नाराज होणार आहेत. त्यांनी नाराज होऊन वेगळा विचार करण्याचे सोडून पक्ष संघटनेसोबत राहावे. आगामी काळात त्यांचा नक्की विचार करून त्यांना विविध समिती, महामंडळांवर संधी दिली जाईल. जिल्ह्यात भाजपला स्वबळावर जिल्हा परिषदेत सत्ता आणायची आहे. त्यासाठी आम्हाला भाजपच्या पक्ष संघटनेवर व कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. त्यामुळे या निवडणुकीतही आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.