साताऱ्यात 'नारळफोड्या गॅंग'चा सुळसुळाट; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

Shivendrasinharaje-Udayanraje Bhosle
Shivendrasinharaje-Udayanraje Bhosleesakal
Updated on
Summary

साताऱ्यात नारळ फोडणारी गॅंग निर्माण झाली आहे.

सातारा : साताऱ्यात सध्या नारळफोड्या गॅंगचा सुळसुळाट असून दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामांची ही गँग उद्घाटन व भूमिपूजन करत आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे नाव न घेता लगावला.

साताऱ्यात नारळ फोडणारी गॅंग निर्माण झाली आहे. जी कामे मंजूर झाली आहेत, त्याचे नारळ फोडायला ही मंडळी पुढे असतात. वीस वर्षांपासून साताऱ्याला पाण्यापासून वंचित ठेवलं असे त्यांचं म्हणणं असेल तर, त्या वेळी ते सुद्धा खासदार होते. युतीच्या काळात ते मंत्री होते, तसेच शाहूपुरी ग्रामपंचायत पहिल्यापासून त्यांच्याकडेच राहिलीय. येथील पंचायत समिती सदस्य ही त्यांचे आहेत. मग, वीस वर्षांपासून शाहूपुरीला पाण्यापासून वंचित कोणी ठेवलं, याचा खुलासा त्यांनी करावा, असे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले. शाहूपुरीवासीयांनी तुमच्याकडे जबाबदारी दिली होती. मुळात दिलीप सोपल (Dilip Sopal) पाणीपुरवठा मंत्री असताना या योजनेला मंजुरी मिळाली. त्यावेळी मी स्वतः मुंबईत होतो, तसेच या वेळी दुसरा महत्वाचा निर्णय झाला की, लोकवर्गणीची अट रद्द झाली. त्यावेळी ही योजना मंजूर झाली. पण, पुढे प्रशासकीय मान्यतेत ही योजना पुन्हा अडकली होती.

Shivendrasinharaje-Udayanraje Bhosle
'102 मतांवरून तीन लाख मतांचा अंदाज बांधणं हास्यास्पद : शंभूराज देसाई

मात्र, अजितदादांनी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. त्यावेळी कास योजनेलाही मान्यता मिळवून दिली. तसेच शाहूपुरी योजनेलाही मान्यता मिळाली. सातारा शहराच्या हद्दवाढीचा निर्णय यापूर्वी झाला असता, मात्र त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे दोन वर्षांपासून ही हद्दवाढ रखडली होती. आता पालिकेच्या निवडणुकीत मते पाहिजेत, म्हणून स्वतःचे अपयश दुसऱ्यावर टाकण्याचे काम ते करत आहेत आणि भाऊसाहेब महाराजांवर (Bhausaheb Maharaj) विनाकारण जुने काहीतरी काढून टीका करत आहेत, असा टोलाही त्यांनी उदयनराजेंचं नाव न घेता लगावला.

Shivendrasinharaje-Udayanraje Bhosle
विधानपरिषदेच्या सहापैकी चार जागांवर भाजप; 'महाविकास'ला धक्का

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com