दमदाटी, खंडणीमुळं एमआयडीसीची वाट लावली : शिवेंद्रराजे

Shivendra Singh Raje Criticise Udayanraje
Shivendra Singh Raje Criticise Udayanrajeesakal
Summary

उदयनराजेंनी ‘पंडित’च्‍या जागा संगनमतांनी शिवेंद्रसिंहराजेंनी कमी किमतीत घेतल्‍याचा आरोप केला होता.

सातारा : सातारा एमआयडीसी (Satara MIDC) वाढत नसल्‍याचे एकमेव कारण खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) असून उद्योजकांना धमकावणे, दमदाटी करणे, वसुल्‍या करायच्‍या आदी कामे ते आणि त्‍यांचे बगलबच्‍चे करतात. या व इतर अनेक कारणांमुळे सातारा एमआयडीसीऐवजी उद्योजकांनी इतर ठिकाणांना पसंदी दिल्‍याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. (Shivendra Singh Raje Criticize Udayanraje)

येथील एका कार्यक्रमादरम्‍यान ते बोलत होते. सातारा औद्योगिक वसाहतीतील (Satara Industrial Estate) पंडित ऑटोमोटिव्‍हच्‍या (Pandit Automotive) जागेच्‍या कारणावरुन दोन्‍ही राजांच्‍यात टीकायुध्‍द सुरु आहे. खासदार उदयनराजेंनी ‘पंडित’च्‍या जागा संगनमतानी शिवेंद्रसिंहराजेंनी कमी किमतीत घेतल्‍याचा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजेंनी काही प्रसारमाध्‍यमांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, ‘‘येणाऱ्या प्रत्‍येकाला दमदाटी करायची, संघटना काढायची, आमचीच माणसे घ्‍या म्‍हणून दबाव आणत बघतो, अशी धमकी देणाऱ्यांनी सगळ्या एमआयडीसीची वाट लावली आहे. या कारणांमुळे या ठिकाणी कारखानदार येत नसून आम्‍ही ‘पंडित’ची जागा रितसर खरेदी केली आहे.

Shivendra Singh Raje Criticise Udayanraje
'राहुल गांधींना कोण विचारतंय, मी त्यांना गांभीर्यानं घेत नाही'

त्‍या ठिकाणी आम्‍ही कारखानाच काढणार आहोत. त्‍यातून रोजगारदेखील निर्माण होणार असून ती बाब सातारकरांसाठी चांगली ठरणार आहे.’’ बंद पडलेली महाराष्‍ट्र स्‍कुटर आम्‍ही सुरु करण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहोत. मात्र, सध्‍यातरी त्‍यात यश येताना दिसून येत नाही. सातारा एमआयडीसीची वाढ खुंटण्‍यात, वाट लागण्‍याचे एकमेव कारण खासदार उदयनराजे असल्‍याची टीकाही त्‍यांनी पुन्‍हा केली. एकंदरीत पंडित ऑटोमोटिव्‍हच्‍या जागेच्‍या कारणावरुन साताऱ्यातील राजकारण तापू लागले असू्न आरोप- प्रत्‍यारोपामुळे राजकीय तणावात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com