
सातारा : कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात सर्व प्रकारचे व्यवसाय बंद होते. वडापाव, पानटपरी, हातगाडे यासारखे सर्वच छोटे व्यवसाय बंद होते. सातारा पालिकेने व्यापाऱ्यांसाठी तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांगला आणि स्वागतार्ह आहे. व्यापाऱ्यांप्रमाणेच साताऱ्यातील सर्वच मिळकतधारकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांप्रमाणे सर्वच मिळकतधारकांना घरपट्टीत सवलत मिळावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. याबाबतचा ठराव पालिकेने करावा, त्याला नगर विकास आघाडी बिनशर्त पाठिंबा देईल, असेही म्हटले आहे.
यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले, की कोरोना महामारीमुळे देशासह संपूर्ण राज्यात आणि जिल्ह्यातही लॉकडाउन होता. या लॉकडाउनच्या काळात सर्वप्रकारचे उद्योगधंदे, व्यवसाय, व्यापार, उद्योग आणि सर्वच प्रकारची दुकाने बंद होती. यामुळे व्यावसायिक, नोकरदार, रोजंदारी आणि हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या सर्वांनाच दिलासा मिळणे अपेक्षित आहे. सातारा पालिकेने शहरातील व्यापाऱ्यांना तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. व्यापाऱ्यांप्रमाणेच सर्व प्रकारचे व्यवसाय बंद होते. नोकरदारांचे पगार बंद होते. अनेकांच्या नोकरीवर गदा आली.
पुणे पदवीधरसाठी सातारा जिल्ह्यात 54 हजार 835 मतदार
मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत. हातगाडे, पानटपरी, फेरीवाले, वडापाव, चहावाले अशा असंख्य लोकांचे छोटे- छोटे व्यवसाय बंद होते. त्यामुळे अशा लोकांना कर भरणे शक्य नाही. याचाही विचार पालिकेने करावा. त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी घेतलेला योग्य निर्णय पालिकेने साताऱ्यातील सर्वच मिळकतधारकांसाठी लागू करावा आणि सर्व मिळकतधारकांना लॉकडाउनच्या कालावधीतील घरपट्टीमध्ये सूट द्यावी.
हद्दवाढीत समाविष्ट भागाचा विचार करा
लॉकडाउनचा फटका सातारा शहराप्रमाणेच हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या सर्वच भागांतील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार यांच्यासह सर्वांनाच बसला आहे. सातारा पालिकेने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतानाच शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिका हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन भागाकडेही पालिकेने लक्ष देण्याची मागणी केली आहे. घरपट्टी माफीचा निर्णय घेताना पालिकेने नवीन भागाचाही विचार करावा, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
व्यावसायिकांची घरपट्टी माफ करा, उदयनराजे गरजले
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.