esakal | मेढा नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ; उपनगराध्यक्षपदी कल्पना जवळ

बोलून बातमी शोधा

Pandurang Javal
मेढा नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ; उपनगराध्यक्षपदी कल्पना जवळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेढा (जि. सातारा) : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पांडुरंग बळवंत जवळ यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते.

छाननीमध्ये ते वैधही ठरले होते. पांडुरंग जवळ आणि पांडुरंग देशपांडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले होते. मात्र, पांडुरंग देशपांडे यांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. नगराध्यक्षपदी जवळ यांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदी कल्पना जवळ यांची निवड करण्यात आली.

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन झालेल्या चर्चेअंती नगराध्यक्षपदासाठी पांडुरंग जवळ यांची, तर उपनगराध्यक्षपदी कल्पना जवळ यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, पांडुरंग देशपांडे यांनीही अर्ज दाखल केला होता. दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेल्या विनंतीस मान देऊन पांडुरंग देशपांडे यांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी कल्पना जवळ यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही अर्ज नसल्याने उपनगराध्यक्षपदी त्यांची निवड बिनविरोध झाली.

देशभरात पसरलेली कोरोनाची भीषण महामारी आणि अत्यंत दूषित वातावरणाची सभोवतालची एक भयावह मरगळ, अशा दुर्धर परिस्थितीत महाराष्ट्राच्या बहाद्दरांनी मिळवलेल्या हिमालयाइतक्या भव्य यशामुळे नक्कीच एक सुखद आणि आशादायी चित्र निर्माण झाले आहे