esakal | शिवेंद्रसिंहराजे बारामतीत भेटले पवारांना; नवीन राजकीय समीकरणे उदयास?
sakal

बोलून बातमी शोधा

शिवेंद्रसिंहराजे बारामतीत भेटले पवारांना; नवीन राजकीय समीकरणे उदयास?

दरम्यान आजच्या उपमुख्यमंत्री अजित पवरांच्या भेटीमुळे आमदार शिवेंद्रसिंहराजेंची पुढची रणनिती काय असणार की पुन्हा काही नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार याबाबत पहावे लागेल असे सरकारनामाचे प्रतिनिधी उमेश बांबरे यांनी नमूद केले.

शिवेंद्रसिंहराजे बारामतीत भेटले पवारांना; नवीन राजकीय समीकरणे उदयास?

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (रविवार) बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मतदारसंघातील कामा संदर्भात भेट घेतली. दरम्यान 'सरकारानामा'च्या प्रतिनिधींस आमची भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती, असे सांगून अधिक भाष्य करण्यास शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendra Raje Bhosale) नकार दिला असला तरी ही भेट सातारा जिल्ह्यात आगामी काळात हाेणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या आणि सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महत्वपुर्ण मानली जात आहे. 

बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संकुलातील व्हीआयआयटीत आज (रविवार) सकाळच्या प्रहरी सातारा- जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आले हाेते. दाेन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनीट बंद खोलीत चर्चा झाली. त्याचा तपशील माहिती करुन घेण्यासाठी माध्यमांनी शिवेंद्रसिंहराजेंना गाठले. त्यावेळी मतदारसंघातील कामासाठी आलो होतो, त्यात वेगळे नव्हते एवढेच शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले. त्यानंतर त्यांनी अधिक बाेलणे टाळले आणि ते तेथून निघून गेले. 

भाजपचे आमदारही आता खोटं बोलू लागलेत; राष्ट्रवादीच्या पवारांचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

सातारा शहराची हद्दवाढ, कास धरणाची उंची वाढविणे आदी विकासकामासंदर्भात यापुर्वीही आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई, पुणे येथे भेट घेतली हाेती. त्यावेळी देखील शिवेंद्रसिंहराजेंनी मी मतदारसंघाच्या कामा निमित्त येत असताे असे माध्यमांकडे स्पष्ट केले हाेते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यात एकदा युवा नेते राहूल कूल, आमदार शिवेंद्रसिंहराजे हे त्यांच्या साता-याच्या कामा निमित्त आले हाेते. आम्ही पण भाजप सरकार असताना लाेकप्रतिनिधी या नात्याने भेटायचाे. काळभेरं घडतय असे समजण्याचे कारण नाही. शेवटी आमचं काम आहे. मी तर सगळ्यानांच भेटत असताे असे स्पष्ट केले हाेेते.

दरम्यान आजची आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट सातारा जिल्ह्यात आगामी काळात हाेणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आणि सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महत्वपुर्ण मानली जात आहे. गेल्या काही दिवसांत आमदार शशिकांत शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंविषयी वक्तव्य केली. यामध्ये आमदार शिंदेंनी जिल्हा बॅंकेत आमदार शिवेंद्रसिंहराजे आमच्याबराेबरच असणार असे म्हटले तर दीपक पवार यांनी भाजपचे आमदार खाेटं बाेलतात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विचारांची माणसे निवडून आली आहेत. समविचारी पक्षांशी चर्चा करुन पालिका निवडणुक लढा असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचे सांगितल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान आजच्या उपमुख्यमंत्री अजित पवरांच्या भेटीमुळे आमदार शिवेंद्रसिंहराजेंची पुढची रणनिती काय असणार की पुन्हा काही नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार याबाबत पहावे लागेल असे सरकारनामाचे प्रतिनिधी उमेश बांबरे यांनी नमूद केले.

यशवंतरावांच्या आत्मचरित्रातील कृष्णा-कोयना अनुभवण्यासाठी सुप्रिया सुळे थेट प्रीतिसंगमावर

माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापूर्वी उदयनराजेंनी जिल्ह्यासाठी काय केलं सांगावं; काँग्रेसच्या नेत्याचं जोरदार प्रतिउत्तर

शरद पवारांच्या सातारा दौऱ्याला आमदारांनी खो घातला? पालकमंत्र्याची चुप्पी

कर्करोग, संसर्गजन्य रोगावर नॅनोकार्गो उपाय; भारतीय संशोधकाचा युरोपियन युनियन कमिशनकडून सन्मान

निवडणुकीसाठी 100 कोटी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ; भाजपची राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ऑफर