

Maharashtra Minister Shivendrasinh Raje Bhosale Makes Cryptic Remark at Satara Event Sparking Political Speculation
esakal
सातारा : ‘जो आपल्याला नडतो, त्याला सोडत नाही!’ अशा सूचक शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेल्या विधानाची साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नेले (ता. सातारा) येथे पै. निलेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.