
सातारा : साताऱ्यात ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या ९९ व्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.