
सातारा: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान साताऱ्याला मिळावा, यासाठी शाहूपुरी मसाप शाखा आग्रही आहे. आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या समितीने साताऱ्यात येऊन छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची त्यांच्या सुरुची या निवासस्थानी भेट घेतली.