

Shivendraraje Bhosale
Sakal
केळघर: निवडणुका आल्या, की जावळी तालुक्यातील विरोधकांना जनतेचा खोटा कळवळा येतो. मंत्रिपद असताना तालुक्यासाठी एकही दमडी निधी न देणाऱ्यांनी जनतेचा बुद्धिभेद करू नये. मी कधीही दादागिरी व दहशतीचे राजकारण केले नाही. विरोधकांनी पातळी सोडल्यास त्यांना जशास तसे उत्तर देण्याची धमक जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्यात निश्चित आहे, असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.