

Shivendrasinhraje Bhosale Says We Are Ready For A Fight Warns Shashikant Shinde Amid Satara District Bank Election Row
sakal
सातारा : जिल्हा बॅंकेसाठी जावळी तालुक्यातील सोसायटींच्या ठरावावरून तापलेले वातावरण अद्याप शांत झालेले नाही. आज सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना धाकदपटशाही करत असाल, तर जशास तसे उत्तर देण्याची आमचीही तयारी आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल, तर संघर्ष आम्हाला नवीन नाही.