

Cannabis Worth ₹12.5 Lakh Seized from Agricultural Land in Satara
Sakal
सातारा : पाली (ता. सातारा) येथील एका शेतात गव्हाच्या पिकात गांजाची लागवड केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून सुमारे १२ लाख ५० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी नामदेव लक्ष्मण माने (रा. पाली) याला अटक करण्यात आली आहे.