Satara News : सातारा जिल्ह्यातील एसटीला दे धक्का! सहा महिन्यांत ५५० गाड्या रस्त्यावरच पडल्या बंद

Satara ST Bus : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटीच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत एसटी बसची संख्या तोकडी आहे.
Satara news
Satara newsSakal

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटीच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत एसटी बसची संख्या तोकडी आहे. नवीन एसटी बस येणार-येणार अशा मोठ्या वल्गना झाल्या. मात्र, प्रत्यक्षात वीसच बस आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक बस या १२ वर्षांहून अधिक काळ झाल्याने त्या आरटीओकडून रिपासिंग करून वापरण्यात येत आहेत. त्यामुळे एसटी बस प्रवासातच बंद पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

सध्या उन्हाळ्याच्या सुटीमुळे एसटीला तुडुंब गर्दी होत आहे. मात्र अनेक मार्गावर एसटी बस बंद पडत असल्याने प्रवाशांच्या आनंदाचा बेरंग होत आहे. सातारा ते कऱ्हाड तासाच्या प्रवासात विविध आगाराच्या पाच एसटी बस बंद पडल्या होत्या, तर सहा महिन्यांत जिल्ह्यातील मार्गावर विविध आगाराच्या सुमारे ५५० एसटी बस बंद पडल्या. त्याकडे एसटी महामंडळाचे मात्र दुर्लक्षच झाल्याने प्रवाशांना तिकीट काढूनही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एसटीला सवलती, पासामुळे प्रवाशांची गर्दी

एसटी महामंडळाने खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत एसटी बसची सेवा सुधारण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ६५ वर्षांवरील सर्वांना अर्ध्या तिकिटात प्रवास, अपंग व अन्य प्रवाशांना एक चतुर्थांश सवलत, विद्यार्थी-विद्यार्थिनींना सवलतीचे पास, महिलांना अर्धे तिकीट आदींसह अन्य प्रवास सवलती दिल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून एसटीच्या उत्पन्नातही भर पडली आहे. त्यामुळे एसटीला मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या आहे.

प्रवासी हजारात.. बस हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच

प्रवाशांच्या संख्या हजारात आणि एसटी बसची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अशी स्थिती जिल्ह्यातील एसटी आगारात आहेत. खासगी वाहनांनी जाणारे प्रवासी महामंडळाच्या बसकडे वळविण्यासाठी अनेक उपक्रम राबवून प्रयत्न केले.

त्याद्वारे त्यांना चांगले यशही मिळून प्रवासी संख्याही वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीसाठी बसची संख्या वाढवलेली नाही. त्यामुळे बसची संख्या मर्यादित आणि प्रवासी हजारात असे चित्र आहे. मात्र, वर्षानुवर्षे असेच चित्र असूनही एसटी महामंडळाकडून त्यात काहीच सुधारणा झाल्याचे दिसत नाही.

रात्रीच्या वेळी प्रवाशांची मोठी गैरसोय

पुणे-मुंबईसह दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी दिवसा उन्हाचा त्रास नको म्हणून बहुतांश प्रवासी हे रात्रीच्यावेळी प्रवासाठी बाहेर पडतात. एसटी बसमधून संबंधित ठिकाणी जाण्यासाठी ते निघाल्यावर रात्रीची एसटी बस बंद पडण्याच्या घटना अनेकदा घडत आहेत.

त्यावेळी संबंधित बसचा वाहक हा दुसऱ्या बसमध्ये त्या बसमधील प्रवासी बसवण्यासाठी महामार्गावर उभा असतो. अशावेळी अनेकदा रात्रीच्या एसटी बस लवकर थांबतच नसल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे प्रवाशांना बराचकाळ एसटीची वाट पाहण्याशिवाय पर्यायच नसतो. त्याचबरोबर एसटी बस मिळाल्यावर संबंधित बसमध्ये दूरच्या प्रवासाचे तिकीट काढूनही बसायला जागा मिळेल याची खात्री नसते. त्यामुळेही प्रवाशांची मोठी गैरसोय होते.

या सोयी आवश्यक

लाइटची तपासणी करण्याची गरज

पावसाळ्यात वायफर चालू असणे आवश्यक

गळक्या एसटी बस दुरुस्ती कराव्यात.

बसच्या पुढील मोठ्या काचेतून चालकाच्या अंगावर येणारे पाणी थांबवण्याची गरज

बसच्या काचा सुस्थितीत आहेत का? याची खात्री करण्याची आवश्यकता

बसमधील बाकड्यांच्या लोखंडी ॲंगलला चढलेला गंज काढण्याची गरज

जिल्ह्यातील स्थिती

एकूण बसची संख्या - ६८०

नवीन आलेल्या बस - २०

दररोजची प्रवासी संख्या - सुमारे एक लाख ७५ हजार

सहा महिन्यांत बंद पडलेल्या सुमारे - ५५०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com