Police investigation underway in the shocking ₹50 lakh extortion case involving a doctor in Mhaswad, Satara district.
Sakal
सातारा
धक्कादायक! डॉक्टरला मागितली ५० लाखांची खंडणी,अत्याचाराच्या तक्रारीने म्हसवडला खंडणीचा कट, सातारा जिल्ह्यात खळबळ
Doctor Extortion Case in Satara District: खोट्या गुन्ह्यात अडकवून डॉक्टरकडून ५० लाखांची खंडणी; म्हसवडमध्ये गुन्हेगारी कटाचा पर्दाफाश
म्हसवड : येथील डॉक्टरला अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी येथील पाच जणांविरोधात खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा प्रथम सातारा येथील पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर तो म्हसवड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

