Rickshaw Accident in Satara : 'रिक्षा ओढ्यात कोसळून एकसरच्या युवकाचा मृत्यू'; रात्री घटना घडल्याने सकाळी आले लक्षात
Youth Dies in Rickshaw Accident : रात्री घटना लक्षात न आल्यामुळे सकाळी नागरिकांनी रिक्षा व मृतदेह पाहिल्यानंतर गावातील युवकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विशाल कळंबे यांचा मृतदेह ओढ्यातून बाहेर काढला.
Rickshaw Accident Claims Life of Eksar Youthesakal
वाई शहर : एकसर (ता. वाई) येथील पुलावरून रिक्षा ओढ्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. विशाल मुगुटराव कळंबे (वय ३७) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. वाईकडून एकसरच्या दिशेने जात असताना सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.