
शिवथर : अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून विवाहितेचा खून केल्याची घटना शिवथर (ता. सातारा) येथे आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली. खून झालेल्या महिलेचे नाव पूजा प्रथमेश जाधव (वय २५) असे आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले; परंतु घटनेचे कारण अद्याप समजू शकले नव्हते.