
वाई : सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यातील हवालदाराला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. लाच घेण्यास प्रोत्साहन दिले म्हणून पोलिस उपनिरीक्षकावरही गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिली.