

Who’s Responsible? Suspicion Grows Over Illegal Interference in Watershed Projects
sakal
सातारा : राज्याच्या मृद व जलसंधारण विभागात जलसंपदा विभागातील आठ अधिकाऱ्यांचा नियमबाह्य पद्धतीने समावेश करून त्यांना पदोन्नती देण्याचा प्रकार झाला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांचे स्पष्ट आदेश आणि नकारात्मक शेरे असतानाही, संबंधित फाइल मंत्रालयातील एका कक्ष अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक पुढे सरकवल्याचे उघड होत आहे.