
कऱ्हाड : येथील कृष्णा नदीच्या पुलावरून तरुणीने नदीत उडी घेतल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय २६, रा. वाखाण रोड, कऱ्हाड, मूळ रा. जत) असे या तरुणीचे नाव आहे. कल्पना हिचे नुकतेच लग्न ठरले होते. दोन दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडाही झाला होता.