कुस्‍तीत ‘सातारी पॅटर्न’ व्हावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 सातारी पॅर्टन

कुस्‍तीत ‘सातारी पॅटर्न’ व्हावा

सातारा : साताऱ्याच्‍या कुस्‍तीला मोठा इतिहास आहे. येथील पैलवानकीचा ठसा आंतराष्‍ट्रीय पातळीवर उमटवण्‍याचे काम अनेक नामांकित पैलवानांनी केले. आंतरराष्‍ट्रीय पातळीवर उमटलेला सातारी ठसा अलीकडे पुसट होताना दिसतो. हा ठसा पुन्‍हा गडद व्‍हावा आणि सातारी कुस्‍तीची परंपरा पुन्‍हा देदीप्‍यमान व्‍हावी, यासाठीचा कुस्तीतज्ज्ञांनी नियोजनबध्‍द आराखडा तयार करणे आवश्‍‍यक आहे. या आराखड्यातून देशात गाजेल असा कुस्‍तीचा ‘सातारी पॅर्टन’ तयार व्‍हावा, अशी ऊर्मी महाराष्‍ट्र केसरीच्‍या आखाड्यातून सातारकरांनी घेणे आवश्यक आहे.

मराठा साम्राज्‍याची राजधानी असणाऱ्या साताऱ्याची ओळख संपूर्ण देशाला आहे. कसदार माती, वळणदार नद्या आणि त्‍यामुळे आलेल्‍या संपन्नतेमुळे साताऱ्याने गेल्‍या काही वर्षांत सर्वच क्षेत्रात चौफेर प्रगती केली आहे. पूर्वीच्‍या काळातील राजाश्रयामुळे येथील कला, क्रीडा क्षेत्र विस्‍तारले. हे क्षेत्र नंतरच्‍या काळात तत्‍कालीन राजकारण्‍यांनी अभय दिल्‍याने आणखी विस्‍तारले. साताऱ्याच्‍या गावागावांत, वाडीवस्‍तीत होणारी कुस्‍ती नंतरच्‍या काळात कोणाच्‍या तरी छत्रछायेखाली एकवटली आणि वाढली. या सातारी कुस्‍तीचा डंका नंतरच्‍या काळात पैलवान खाशाबा जाधव, पैलवान श्रीरंगअप्‍पा जाधव यांनी आंतरराष्‍ट्रीय पातळीवर वाजवला. या डंक्‍यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष सातारा, तेथील आखाडे, त्‍यातील लाल माती आणि त्‍यात झुंजणाऱ्या पैलवानांकडे वेधले गेले. परंतु, सातारची कुस्तीची ही परंपरा अलीकडे खंडित झालेली दिसते.

सध्‍या जिल्‍हा तालीम संघाचे एकहाती नेतृत्‍व शिवछत्रपती पुरस्‍कार विजेते साहेबराव पवार हे करताहेत. नेतृत्‍व, संस्‍था म्‍हटले की त्‍याठिकाणी वाद आणि इतर तांत्रिक-अतांत्रिक बाबी आल्‍याच. साताऱ्याच्‍या कुस्ती क्षेत्रातील दोन्‍ही प्रकारातील ज्ञान हवे

मातीतील कुस्‍तीत जास्‍तीची ताकद पैलवानाला लावावी लागले. ही ताकद पणाला लावतानाच पैलवान वस्‍तादाने दिलेल्‍या धड्यांचा आधार घेत मैदान मारण्‍याचा प्रयत्‍न करतात. राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय पातळीवर गादी प्रकारातील कुस्‍ती पुढे येत असून त्‍याचे तंत्र मातीत खेळणाऱ्या मल्‍लांनी अवगत करणे आवश्‍‍यक आहे. त्यासाठी त्‍यांना चांगला प्रशिक्षक, लढतीपूर्वी पैलवानांचे मानसिक समुपदेशन करणारे तज्ज्ञ, तसेच आंतराष्‍टीय कामगिरी करणाऱ्या पैलवानांची प्रशिक्षणे आणि प्रात्‍यक्षिक शिबिरांचे आयोजन साताऱ्यात येथे होणे आवश्‍‍यक आहे.

साखर कारखान्‍यांनी घ्‍यावा पुढाकार

जिल्‍ह्या‍त कार्यरत असणारे साखर कारखाने राजकीय घराणांच्‍या अधिपत्‍याखाली आहेत. त्यापैकी सह्याद्री कारखान्‍याने सर्वांत प्रथम पैलवानांना दत्तक घेण्‍यास सुरुवात केली. अलीकडच्‍या काळात किसन वीर कारखान्‍याने‍ही त्‍याच पध्‍दतीने पैलवानकीला प्रोत्‍साहन देण्‍यासाठीचे अनेक उपक्रम राबवले होते. राज्‍याच्‍या इतर भागातील पैलवानकी साखर कारखान्‍यांच्‍या आश्रयामुळे विस्‍तारली आहे. त्‍याच धर्तीवर साताऱ्यातील कुस्‍ती विस्‍तारण्‍यासाठी इतर साखर कारखानदारांनी व राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.

Web Title: Should Satari Pattern Wrestling

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top