esakal | श्रमिक मुक्ती दलाचे एकाच दिवशी गावागावांत आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

श्रमिक मुक्ती दलाचे एकाच दिवशी गावागावांत आंदोलन

हाथरसमधील मुलीवर अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. राज्यसरकार आणि प्रशासन या आरोपींना पाठीशी घालत आहे. तिच्यावर झालेला अत्याचार, त्यानंतर तिची जीभ छाटणे, तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या साऱ्या घटना संशयास्पद आहेत, असे या आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

श्रमिक मुक्ती दलाचे एकाच दिवशी गावागावांत आंदोलन

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये एकाच वेळीस पंधरा हजार नागरिकांनी सहभाग नाेंदविला.

ही घटना काही पहिलीच नाही, चाळीस वर्षांपूर्वी बिहारमध्ये जी बेलची गावात घटना घडली तिथपासून ते महाराष्ट्रातील खैरलांजी ते हाथरस पर्यंतच्या हजारो घटना घडत आहेत, आणि त्या वाढतच चालल्या आहेत. म्हणून अशा प्रकारच्या सगळ्या घटनांना आळा घालण्यासाठी हे आंदोलन आहे, अशी भूमिका श्रमिक मुक्ती दलाने घेतलेली आहे.

आंतरराष्ट्रीय फोटोग्राफीत साताऱ्यातील फिल्मला नॉमिनेशन

खरं तर ही घटना केवळ अत्याचाराची नाही तर त्यामागे जात वर्चस्व आणि जातीय अहंकार आहे. गुन्हेगारांना शिक्षा होऊन तिला न्याय मिळाला पाहिजे पण याबरोबरच जातीय आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना थांबायच्या असतील तर उतरंडीची जातीव्यवस्था संपली पाहिजे. तिच्या अंताची चळवळ तीव्र केली पाहिजे तरच या घटना कायमच्या थांबणार आहेत. म्हणून जाती अंताची चळवळ तीव्र करण्याचा निर्धार श्रमिक मुक्ती दलाने केला आहे.

सेंट झेविअर्स सुरुच हाेती ? शिक्षण विभागाच्या अहवाल गुलदस्त्यात

हाथरस मधील या मुलीला न्याय मिळवून गुन्हेगारांना कठोर शिक्षा तर झाली पाहिजेच, म्हणून हे आंदोलन तर आहेच परंतु यामध्ये  "जाती तोडो-समाज जोडो" ही श्रमिक मुक्ती दलाची दुसरी घोषणा आहे, त्या दृष्टीने आंदोलनातील सहभाग पाहता 80 टक्केचा सहभाग हा ज्यांना सवर्ण समजले जाते अशा कष्टकरी स्त्री-पुरुषांचा होता हे या आंदोलनाचे वैशिष्ट्ये होते. 

मुलीच्या नावाने उघडा खाते, ती 21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख

हे आंदोलन शेवटचे नाही, या आंदोलनानंतर जर अशा घटना घडत राहिल्या तर हे आंदोलन अधिक व्यापक व तीव्र करण्याचा निर्णय श्रमिक मुक्ती दलाने घोषित केले. हे आंदाेलन डॉ भारत पाटणकर, कॉ संपत देसाई, डॉ प्रशांत पन्हाळकर, मोहन अनपट, चैतन्य दळवी, डी के बोडके, मेजर बन, संतोष गोटल यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात झाले. आंदाेलन काळात गावागावात आंदोलक आपापल्या दारात बसले होते.

'मोदी से कोई बैर नहीं, नितीश तेरी खैर नहीं' अशी काहीशी भुमिका लोजपाने स्विकारली आहे.

loading image