esakal | 'बंधाऱ्यातील पाणी उडी मारून शेतात जाणार का?'; भारत पाटणकरांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Bharat Patankar

धरणाच्या लाभक्षेत्रात वांग नदीवर दहा बंधारे बांधले म्हणजे शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला असे समजून कसे चालेल?

'बंधाऱ्यातील पाणी उडी मारून शेतात जाणार का?'

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : मराठवाडी धरणाचे (Marathwadi Dam) पाणी बंधाऱ्यांतून उडी मारून लाभक्षेत्रातील शेतकरी आणि तेथे पुनर्वसित झालेल्या धरणग्रस्तांच्या शेतात येणार नाही, हे जबाबदार अधिकाऱ्यांनी अगोदर ध्यानात घ्यावे. यापूर्वी ठरल्याप्रमाणे शासनाने स्वखर्चाने लाभक्षेत्रातील शेतीला पाणी उचलून देण्याबाबत तातडीने नियोजन न केल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे (Shramik Mukti Dal) अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर (President Dr. Bharat Patankar) यांनी आज दिला. (Shramik Mukti Dal President Dr. Bharat Patankar Warns The Government About Marathwadi Dam Issue bam92)

ते म्हणाले, ‘‘दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांच्यासमवेत झालेल्या पाटबंधारे विभागाचे (Department of Irrigation) अधिकारी व श्रमिकच्या बैठकीत याप्रश्नी चर्चाही झाली आहे. मराठवाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन मूळच्या लाभक्षेत्रातील कऱ्हाड-पाटण तालुक्यासह सांगली जिल्ह्यातही करण्याचा निर्णय २४ वर्षांपूर्वी शासनाने घेत तशी पावलेही उचलली. यातील सांगली जिल्ह्यातील टेंभूच्या लाभक्षेत्रातील शेतकरी व पुनर्वसित धरणग्रस्तांच्या शेतापर्यंत पाणी पोचविण्याचे काम सुरू आहे. मात्र, कऱ्हाड व पाटण तालुक्यांत पुनर्वसित झालेले धरणग्रस्त व त्यांना जमिनी देणारे स्लॅबपात्र शेतकऱ्यांचे काय? धरणाच्या लाभक्षेत्रात वांग नदीवर (Wang River in Patan ) दहा बंधारे बांधले म्हणजे शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला असे समजून कसे चालेल?

हेही वाचा: ऐतिहासिक किल्ले धोक्यात; शिवरायांच्या विचारांना तिलांजली देण्याचा प्रयत्न!

बंधाऱ्यातील पाणी उडी मारून शेतात जाणार आहे का? यापूर्वी शासनाने आणि जबाबदार घटकांनी स्वखर्चाने पाणी शेतात पोचवू, असा शब्द दिला आहे. तो पूर्ण करायलाच हवा. मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील बहुतांश जमिनीची स्थिती बंधारे एकीकडे आणि जमिनी भलतीकडे अशीच आहे. पालकमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवल्याने त्यांच्या शिफारशीने जबाबदार अधिकाऱ्यांनी मंत्रालयात प्रस्ताव सादर करावा.’’ दरम्यान, श्रमिकचे कार्यकर्ते दिलीप पाटील, सुरेश पाटील म्हणाले, ‘‘तत्कालीन आयुक्त अरुण भाटिया व तत्कालीन जलसंपदामंत्री रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी मराठवाडीच्या लाभक्षेत्रास शासन पाणी उचलून देणार, असा शब्द यापूर्वीच दिलेला आहे.’’

हेही वाचा: प्रतापगड सुरू न झाल्यास टाळे तोडू; आमदार शिंदेंचा गर्भित इशारा

या प्रश्नी शासनाने तातडीने निर्णय जाहीर न केल्यास लाभक्षेत्रातील शेतकरी आणि तेथील पुनर्वसित धरणग्रस्त या दोन्ही घटकांना घेऊन आम्हाला लढा उभारावा लागेल. हा संघर्ष तीव्र असेल, याचे भान संबंधितांनी ठेवावे.

-डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल

Shramik Mukti Dal President Dr. Bharat Patankar Warns The Government About Marathwadi Dam Issue bam92

loading image