
सातारा : सज्जनगड येथे दासनवमी उत्सवानिमित्त श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने कीर्तन, दासबोध पारायण असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम २२ फेब्रुवारीपर्यंत सज्जनगड येथे चालणार आहेत.
या उत्सव कालावधीत प्रथमेश तारळकर व सहकलाकारांची ताल यात्रा, धनंजय म्हसकर, केतकी चैतन्य, ऋषिकेश बडवे, निधी घारे, ओंकार प्रभू धाटे, संपदा माने गायन, सुशील गद्रे, श्रुती भावे गायन सादर करणार आहेत.